सातारा : अस्तित्व लपविल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 जुलै रोजी रात्री पावणे नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान राधिका सिग्नल, भाजी मंडई येथील पार्किंग मध्ये सुरज किसन सकटे राहणार तोफखाना सातारा हा त्याच्या तोंडाला टॉवेल बांधून अंधारात आपला चेहरा झाकून कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असलेला सापडला. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.
अस्तित्व लपविल्या प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 31 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा