महा रक्तदान शिबिरात सातारकरांचा भव्य प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 15 October 2025


सातारा : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट आणि माऊली ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरास सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराचे आयोजन मंदिर ट्रस्टच्या वतीने राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद परिसरात विशेष भव्य मंडप उभारून करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत मंदिर ट्रस्टने गेली 11 वर्षे रक्तदान महायज्ञ सुरू ठेवला असून या रक्तदान शिबिरामध्ये तरुण तसेच रक्तदान करण्यासाठी योग्य अशा ज्येष्ठ व्यक्तींची तपासणी करून त्यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदानाचा आनंद घेतला.

रक्तदान हे खरोखरच सर्वश्रेष्ठ दान आहे, या माध्यमातून रक्तदान शिबिर करून सातारा जिल्ह्यामध्ये माऊली ब्लड बँकेच्या रक्ताची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी हा विशेष प्रयत्न दरवर्षी मंदिर ट्रस्ट या उपक्रमातून करीत असल्याची माहिती यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली.

माऊली ब्लड बँकेचे वतीने बँकेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध सर्जन  डॉ.गिरीश पेंढारकर, मेडिकल ऑफिसर डॉ.रमण भटड, सचिव अजित कुबेर यांचेसह माधव प्रभुणे, डॉ.अथर्व दांडेकर यांनी या रक्तदान शिबिरात  12 कर्मचाऱ्यांच्या  सहकार्याने हे शिबिर यशस्वी पार पाडले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना रक्तदानानंतर भेटवस्तू, सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. मंदिर ट्रस्टच्या वतीने देवीचा महाप्रसाद तसेच सन्मानाची शाल ही घालून गौरव करण्यात आला. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खासगी बसला भीषण आग
पुढील बातमी
महाभारतातील “कर्ण” पंकज धीर यांचे निधन

संबंधित बातम्या