जखिणवाडीतील युवकाच्या खुनप्रकरणी पाचजण ताब्यात; रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू

by Team Satara Today | published on : 29 October 2025


कराड :  जखिणवाडी, ता. कराड येथील युवकाच्या खुनप्रकरणी कराड शहर पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.

प्रवीण सुभाष बोडरे (वय 34, रा. जखिणवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश येडगे, देवेंद्र येडगे, मुबारक शेख (तिघेही रा. जखीणवाडी) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण धनाजी बोडरे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखिणवाडी येथे एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीवेळी बॅनर लावण्याच्या कारणावरून प्रवीण बोडरे याचा अविनाश येडगे, देवेंद्र येडगे यांच्यासह संशयीतांशी वाद झाला होता. या वादाचा राग संशयीतांच्या मनात होता. त्या रागातूनच संशयीतांनी शनिवारी, दि. 25 सायंकाळी नांदलापूर येथील डिसले आळीत प्रवीण बोडरे याच्यावर तलवार, कोयता यासह धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला. त्यानंतर संशयीत पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. या गुन्ह्यात बुधवारी पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास केला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृष्णा नदीपात्रात उडी घेतलेल्या युवतीला वाचविले; पोलीस कर्मचारी संताजी माने यांची कर्तव्यदक्षता
पुढील बातमी
कुट्टी मशिनमध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू; सस्तेवाडी येथील घटना

संबंधित बातम्या