सातारा : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातारा सध्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करत आहे. या विद्यालयाचा 101 वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा न्यू इंग्लिश स्कूल सातारा चे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे राष्ट्रीय दुखावट्यात साजरे होणारे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा रद्द करून आता हा सोहळा मंगळवार दि.7 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 4 वाजता न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यास समस्त सातारकरांनी तसेच शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शाळा समितीचे वतीने विश्वस्त अनंत जोशी, सदस्य सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे यांचेसह शालाप्रमुख सुजाता पाटील या सोहळ्याचे कार्याध्यक्ष श्रीनिवास कल्याणकर, उपकार्याध्यक्ष सुधाकर गुरव यांनी केले आहे.