अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि बॉलिवूडची कूल टाइम गर्ल रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच पडद्यावर झळकणार आहेत. होय, या दोघांचा पहिल्या चित्रपट 'आझाद'चा मोस्ट अवेटेड ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत, तसेच ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये गर्लफ्रेंडच्या भूमिकेत असलेल्या डायना पेंटीची ही झलक पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाची कथा एका कुशल घोडेस्वाराची आहे, ज्याची भूमिका अजय देवगणने साकारली आहे, जो क्रूर ब्रिटिश सैन्याच्या तावडीतून सुटतो. त्यानंतर चित्रपटाचे कथानक अधिक खोल वर जाते, तेवढ्यात त्याचा घोडा बेपत्ता होतो. या चित्रपटात रवीनाची मुलगी राशा थडानीची स्टाईल आणि अमनचा दमदार अभिनय यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरचा हा चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.