12:32am | Nov 19, 2023 |
सातारा : आम्ही कोणाचे तरी काढून आम्हा मराठ्यांना आरक्षण द्या, असे आजपर्यंत म्हटलेले नाही. आमच्या हक्काचे आरक्षण आम्हांला मिळावे, ही भूमिका आमची आहे. ज्येष्ठ मंडळींनी समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान आरक्षणावरुन समाजा-समाजात कोण तेढ निर्माण करत असेल तर संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला आमचे समर्थन असेल, असेही राजेंनी नमूद केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज शनिवारी सातारा येथील गांधी मैदानावर जरांगे पाटील यांची आशीर्वाद सभा झाली. या सभेनंतर जरांगे पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी मातेची दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची, तसेच सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही सर्वजण कुटूंबांसह मराठा मोर्चात सहभागी होतो. आजच्या साता-यातील सभेस देखील जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहु. संपुर्ण राज्य त्यांनी हादरवले आहे. समाजाला कुंभकर्णाच्या झोपेतुन जागे करण्याचे काम मनोज जरांगे यांनी केले आहे. आमच्या हक्काचे आरक्षण आम्हांला मिळावे, ही आमची मागणी असल्याचे शिवेंद्रराजेंनी नमूद केले. मनोज जरांगे पाटील हे लोकशाहीतील योद्धे असल्याचे कौतुक शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटील यांचे केले. दरम्यान समाजाच्या विरोधात कोण भूमिका घेत असेल तर संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी केलेल्या मागणीला आमचा पाठींबा राहील, असेही राजेंनी म्हटले आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |