सातारा : अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी स्कूल बसचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ रोजी सकाळी नऊ वाजता एमआयडीसी सातारा मधील सावकार कॉलेज परिसरात हणमंत सुभाष किर्दत (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) हा स्कूलबस (क्र. एमएच ११ डीटी ००५०) च्या मागे उभा होता. त्यावेळी बस चालक अभयसिंग शंकर डांगे (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) हा स्कूलबस मागे घेत असताना झालेल्या अपघातात हणमंत किर्दत यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.