सातारा : दि. १९ मे २०२५ : अनंत इंग्लिश स्कूल, सातारा व डिजाईनव्हिओ प्रायव्हेट लिमिटेड, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला १५ दिवसांचा “AI मोबाईल अॅप्लिकेशन डिझाइन” समर कॅम्प अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अॅप्लिकेशन डिझाइन व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. १९ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी सातारा एज्युकेशन सोसायटीचे तसेच सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. चेतना माजगावकर,संचालक सुनील झंवर, डिजाईनव्हिओ प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पवार,CTO निलम किर्दत, प्राचार्य श्री श्रीमंत गायकवाड उप मुख्याध्यापक सौ अंजना शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, तांत्रिक कौशल्य व आत्मविश्वास निर्माण होतो, असे गौरवोद्गार काढले. समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांचा तांत्रिक विकास साधण्यास मदत झाली असून पालक व शिक्षकांनीही उपक्रमाचे विशेष कौतुक केले.