एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर पुण्यात बलात्कार

प्रसिद्ध उद्योगपती मनोज कुंडलिक तुपे यांच्यावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 30 October 2025


बारामती : बारामती येथील नामांकित उद्योगपतीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे प्रसिद्ध उद्योगपती मनोज कुंडलिक तुपे यांच्यावर पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता आणि आरोपी मनोज तुपे यांची ओळख 2021 साली बारामतीत झाली, जिथे आरोपीने मोठ्या व्यवसायाची ओळख सांगत विश्वास संपादन केला. तुपे याने नंतर पीडित तरुणीला व तिच्या मैत्रिणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. मे 2021 पासून पीडिता पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी स्थायिक झाली. त्यानंतर तिचे आरोपीशी सतत फोनवर बोलणे सुरू राहिले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2021 मध्ये आरोपीने गाडीत जबरदस्ती केली आणि नंतरही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन लग्नाचे आमिष देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.दरम्यान, पीडितेचे 2022 मध्ये लग्न झाले होते. मात्र 2023 पासून ती नवऱ्यापासून विभक्त झाली. या काळातही आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. 2025 मध्ये लग्नावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आरोपीने समाजातील प्रतिष्ठेचा हवाला देत लग्नाला नकार दिला, दरम्यान प्रेग्नन्सी टाळण्यासाठी त्याने जबरदस्तीने गोळ्या दिल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मनोज तुपे याच्यावर बलात्कार, धमकी, फसवणूक अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना 2021 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रसिद्ध उद्योगपतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने बारामती परिसरात आणि उद्योगजगतात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी उद्योगपती असल्याने, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असून पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किडनी फेल होणे
पुढील बातमी
अरे बापरे हे काय? ऐकावे ते नवलच.... त्यातर निघाल्या जयश्री दिगंबर नव्हे जयश्री संतोष आगवणे

संबंधित बातम्या