08:39pm | Nov 29, 2024 |
सातारा : सातारा पालिकेचे परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या पाणी न देण्याच्या आडमुठ्या धोरणाचा गोडोली ग्रामस्थांनी शुक्रवारी निषेध केला. येथील समाज मंदिर परिसरात गोडोली ग्रामस्थांनी निषेध सभा बोलवत घडल्या प्रकाराची नाराजी व्यक्त केली. आम्ही सुद्धा पालिकेचे करदेयक आहोत. त्यामुळे आम्हाला सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी करत गोडोली ग्रामस्थांनी पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी केले.
गोडोली गावठाणामध्ये प्रचंड पाणीटंचाई असल्यामुळे व परिसरात दोन विवाह समारंभ असल्यामुळे मोरे पाटील यांनी पालिकेकडे टँकरची नोंद करून पाण्याची मागणी केली होती. मात्र पाणी उपलब्ध न झाल्यावरून पालिका अधिकारी प्रशांत निकम व शेखर मोरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणाचा पालिका कर्मचार्यांनी पालिकेचे कामकाज बंद ठेवून निषेध केला. शनिवारी गोडोली ग्रामस्थांनी चक्क पाणी न देणार्या त्या अधिकार्याच्या निषेधार्थ निषेध सभा बोलावली आणि या प्रकरणाचा सर्व ग्रामस्थांनी निषेध केला.
सातारा पालिका काही विशिष्ट लोकांसाठी चालवली जात आहे. तेथे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही, असा आरोप शेखर मोरे पाटील यांनी करत संबंधित अधिकार्याची तात्काळ बदली मुख्याधिकार्यांनी करावी, अशी मागणी केली. आम्ही सुद्धा या भागातील करदाते आहोत. आम्हाला सुद्धा पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका मोरे पाटील यांनी मांडली. यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा गोडोली ग्रामस्थांनी दिल्या. निकम यांनी आणीबाणीच्या काळामध्ये एक गाडी स्टॅन्ड बाय ठेवावी लागते, असे कारण सांगत सरकारी नियम सांगितला. मात्र याच मुद्द्यावर बोट ठेवून गोडोली ग्रामस्थांनी पाणी न मिळाल्याचा निषेध करत पालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे. याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |