09:11pm | Apr 29, 2023 |
फलटण : दोन खुनांच्या गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी जेरबंद करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. रोशन अविनाश ऊर्फ ऍडीसन भोसले रा. इंदीरानगर झोपडपट्टी अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर हल्ली रा. कापशी ता. फलटण जि. सातारा असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री शंकर पाटील यांनी वरीष्टांचे मागदर्शनाखाली व सहकारी अधिकारी अंमलदार यांचेशी विनीमय करुन फरारी आरोपींना पकडण्याची मोहीम आखली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 325/2020 भादवि 302, 307, 201, 452, 143, 147, 148, 149, 188, आर्म ऍक्ट 4, 25, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(बी) या गुन्ह्यातील आरोपी नामे रोशन अविनाश ऊर्फ ऍडीसन भोसले रा. इंदीरानगर झोपडपट्टी अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर हल्ली रा. कापशी ता. फलटण जि. सातारा हा दिनांक 27/4/2023 रोजी सातारा सेशन कोर्ट येथे येणार असलेबाबत पोनि शंकर पाटील यांना त्यांचे बातमीदार यांचेमार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी वरिष्टांचे मागदर्शनाखाली सदर आरोपीस पकडण्याची योजना आखली व त्याची अंमलबजावणी करणेकामी पैरवी अधिकारी सपोफी संजय पाटील सातारा सेशन कोर्ट, सपोफी संतोष कदम, पोहवा चंद्रकांत धापते. पोकॉ, काकासो कर्णे यांचे पथक पोउनि सुरज शिंदे यांचे अधिपत्याखाली तयार करुन त्यांना सातारा येथे रवाना केले. दिनांक 27/4/2023 रोजी दुपारी 2.00 वाजताचे सुमारास आरोपी रोशन अविनाश भोसले हा वरील नमुद पथकास सातारा सेशन कोर्ट ते आर.टी.ओ. ऑफिस सातारा येथे रस्त्याने जाताना दिल्याने सदर आरोपीस नमुद पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शिताफीने पकडुन ताब्यात घेतला. त्यानंतर त्यास फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले व त्याचेकडे कसून व त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता सदरचा आरोपी हा फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 117/2019 भादवि, 302, 307, 143, 147, 148, 149 मध्ये गुन्हा घडलेपासुन फरारी आहे असे लक्षात आले. आरोपीस गुरन 325/2020 या गुन्ह्यात अटक केली असुन तपास सपोनि नितीन केणेकर हे करीत आहेत. त्यांनी संशयितास श्रीमती ढवळे कोर्ट प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी फलटण न्यायालय येथे हजर ठेवले असता कोर्टाने आरोपीला दि. 3 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहा. पोलीस निरीक्षक नितीन केणेकर, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे, सहा पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पो. हवालदार चंद्रकांत धापते, पो. नाईक नितीन भोसले, पो. कॉन्स्टेबल काकासो कर्णे यांनी केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |