सातारा : सातारा शहर परिसरातून दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत. खेड ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने (एमएच ११ सीई ५८२४( या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १० ऑक्टोबर राेजी घडली. याप्रकरणी ऋषीकेश दादासो पवार (वय २६, रा. साप, ता. काेरेगाव) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी दुचाकी दौलतनगर, सातारा येथून चोरी झाली आहे. याप्रकरणी किरण विठ्ठल शिंदे (वय २९, रा. दौलतनगर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. १० ऑक्टोबर रोजी एमएच ११ एव्ही ६४१८ या क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरुन नेली.