कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 20 December 2024


सातारा : कंपनीच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जुनी एमआयडीसी सातारा येथील धनश्री इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या पार्किंग मधून वैभव अर्जुन कळंबे सध्या रा. अमरलक्ष्मी, कोडोली, सातारा यांच्या मालकीची दुचाकी क्र. एमएच 11 सीसी 5644 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी
पुढील बातमी
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल

संबंधित बातम्या