सातारा : खेड ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश महादेव खाडे (रा,खेड, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी घरातून मंगळसूत्र, सोन्याच्या रिंगा, कानातील जोड असा एकूण 2 लाख 72 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.