सातारा : प्रवाशांसाठी सातत्याने गैरसोयीचे कारण ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाची आणि चौपदरीकरण प्रक्रियेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली. पळस्पे फाटा, पेण, साखरपाडा ते थेट रत्नागिरी असा मोठा दौरा करत शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित खात्यांच्या अभियंत्यांना काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.
या दौर्या वेळी मंत्री भरत शेठ गोगावले, आमदार किरण सामंत, आमदार प्रशांत ठाकूर, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या संदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या. या दृष्टीने काम दर्जेदार व्हावे आणि प्रवाशांना महामार्गावर जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी या दोन दिवसीय दौर्याच्या आयोजन केले होते. पळस्पे फाटा, पनवेल, पेन रेल्वे स्टेशन, साखरपाडा, वाशी नाका, कॉलेटी, कोलाड, महाड, कशेडी बोगदा, संगमेश्वर, रत्नागिरी असा हा दौरा करण्यात आला. ठिकठिकाणी संबंधित अधिकार्यांची शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठक घेऊन अधिकार्यांना लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारण्यात येत असलेल्या कामाचा आढावा रत्नागिरी येथील बैठकीत घेण्यात आला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध रस्ते हॅम, एबीडी, सीआरपीएफ, नाबार्ड आदी रस्त्यांचा आढावा शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. तसेच पाली तालुका रत्नागिरी येथील पुलाची पाहणी केली. कशेडी बोगदाची उर्वरित देणे त्या मार्च अखेर पर्यंत सुरू करण्याच्या सूचना दिल्या. वाहन चालक, प्रवासी व स्थानिकांची गैरसोय दूर करून महामार्गावर सुविधा देण्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना निर्देशित केले.