सातारा : सातारा शहरासह तालुक्यात बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोन महिलांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेकडून 10760 रुपये किंमतीच्या देशी, विदेशी बाटल्या जप्त केल्या आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवार पेठेत केली आहे.
दुसरी कारवाई मालगाव ता.सातारा येथील महिलेवर करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेकडून 2695 रुपये किंमतीच्या 77 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई दि. 10 नोव्हेबर रोजी करण्यात आली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.