दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नरेला परिसरातील भोरगड इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथील फूड फॅक्ट्रीला लागलेल्या भीषण आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या फूड फॅक्ट्रीमध्ये पहाटे ३ वाजता बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयातून मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. नरेला येथील फूड फॅक्ट्रीत आग लागल्याची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आज पहाटे ३:३५ वाजता पीएस एनआयएला पीसीआर कॉल आला.
फूड फॅक्ट्रीत आग लागली आहे. मात्र यामध्ये कोणी अडकलं आहे का याबाबत नेमकी माहिती नाही असं कॉलमध्ये सांगण्यात आलं. यानंतर तातडीने तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता असं आढळून आले की, मूग डाळ बनवणाऱ्या फॅक्ट्रीला आग लागली असून काही लोक आतमध्ये अडकले आहेत.
अग्निशमन विभागाच्या मदतीने एकूण नऊ जणांना वाचवण्यात आले आणि त्यांना नरेला येथील एसएचआरसी रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी तिघांचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचं समोर आलं आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |