मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 January 2025


सातारा : सातारा शहर परिसरात अवघ्या साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण श्रीरंग मोरे (वय 30, रा. मोरेवाडी ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 19 जानेवारी रोजी घडली आहे. अल्पवयीन मुलगी खेळत असताना संशयित प्रवीण मोरे याने पाहिले. मुलगीजवळ कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीला टेरेसवर नेले. तेथे त्याने अत्याचार केला असता मुलगी रडू लागली. संबंधित घटनेची माहिती कोणाला देवू नको, असे म्हणत मुलीला धमकावले. या घटनेशिवाय इतरवेळीही मुलीचा विनयभंग केला. या सर्व घटनेने मुलगी घाबरुन गेली होती. मुलीच्या आईने मुलीला बोलते केल्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती तिने दिली. यानंतर मुलीच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. पोलिसांनी त्यानुसार संशयिताविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे
पुढील बातमी
जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम

संबंधित बातम्या