सातारा : पत्नी फोनवर खूप बोलत असताना कोणाबरोबर बोलत आहे,असे विचारल्याच्या कारणातून पत्नीने डोक्यात राग ठेवून पतीला शिवीगाळ करत घरातील लाकडी लाटण्याने पतीच्या डोक्यात मारून जखमी केले आहे.
याची फिर्याद अर्जुन शिवाजी सपकाळ (वय ३२ वर्ष रा, ५० दुर्गा पेठ केसरकर पेठ सातारा) यांनी सातारा शहर पोलिसात दिले आहे. याप्रकरणी पत्नी कविता सपकाळ यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवलदार पवार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.