सातारा : बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी स्वप्नील सतिश कदम (वय ३५, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताकडून ११२० रुपये किंमतीच्या १४ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी बोगद्या परिसरात ही कारवाई केली.
दुसरा गुन्हा शंकर मडीवळ नाटेकर (वय ४२, रा. नागेवाडी, ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७०० रुपये किंमतीच्या २० दारुच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी ही कारवाई नागेवाडी येथे केली आहे.