सातारा : सातारा शहरातील मुलामुलींच्या बालगृह निरीक्षण गृहातून 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी मीना धनराज चौरे (रा. काळजी वाहक बालगृह) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा