नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅसचे दर अपडेट केले आहेत. यावेळीही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही पण, 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहेत. होय, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 17 रुपयांची कपात जाहीर केली गेली आहे.
नवीन महिन्यात LPG सिलिंडर स्वस्त झाला
1 मे रोजी गॅसच्या किमतीत झालेल्या बदलानुसार, आता राजधानी दिल्लीत दोन महिन्यांत 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 1,747.50 रुपये मोजावे लागतील तर, गेल्या महिन्यात यासाठी 1,762 रुपये आणि मार्चमध्ये 18,03 रुपये द्यावे लागत होते. अशाप्रकारे, 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत दोन महिन्यांत 55.5 रुपये आणि एका महिन्यात 14.5 रुपयांनी कमी झाली आहे.
त्याचवेळी, घरगुती LPG गॅसचे दर 8 एप्रिल रोजी अपडेट करण्यात आले. त्यावेळी सरकारने, जवळपास एक वर्षानंतर, 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती तर, याआधी 1 एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल झाला.
व्यावसायिक सिलिंडरच्या दर कपातीचा सामान्यांना काय फायदा
19 किलो वजनाचे गॅस सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट्स इत्यादी व्यावसायिक कारणांसाठी वापरले जातात. अशा परिस्थितीत, त्याची किंमत असेल तर हॉटेल, रेस्टॉरंट्स इत्यादी त्यांच्या मेनूमधील किंमत कमी करू शकतात, ज्याचा फायदा सामान्य लोकांना होऊ शकतो. 2025-26 च्या अर्थसंकल्पात, सरकारने एलपीजी सबसिडीसाठी 11,100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
देशात एकूण 32.9 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यापैकी 10.33 कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत असून या योजनेत गरिबांना 300 रुपयांनी कमी किमतीत सिलिंडर मिळतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये (तामिळनाडू, आंध्र प्रदेश), राज्य योजना आधीच सुरू असल्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत फक्त 10% लाभार्थी आहेत. 7 एप्रिल रोजी झालेल्या दरवाढीनंतर सामान्य ग्राहकांसाठी 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 803 रुपयांवरून 853 रुपये झाली तर उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी घरगुती सिलिंडरची किंमत आता 503 रुपयांवरून 553 रुपये झाली आहे.