सातारा : विषारी औषध प्राशन करून एका महिलेने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संगीता दत्तात्रय मुळीक रा. मुळीकवाडी, पोस्ट तासगाव, ता. सातारा या महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.