सातारा : येथील सदरबझार परिसरातील पुष्पक अपार्टमेंट, कुपर कॉलनी परिसरातील एका विवाहितेचा कौटुंबिक छळ प्रकरणी तेथील तिघांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी याबाबत फिर्यादी शितल हेमंत बागडे (वय ३८, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सन २०१३ पासून त्यांचे पती हेमंत सुभाष बागडे हे दारूच्या नशेत सातत्याने हाताने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप तक्रारीदवारे करण्यात आला आहे. तसेच, मुलगी झाली या कारणावरून सासू शोभा सुभाष बागडे व सासरे सुभाष गणपती बागडे (तिघेही. रा. सातारा) यांनी अपमानास्पद बोलून वारंवार ''तू आमच्या घरात राहू नकोस'' असे म्हणत मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घरातील खाण्याचे पदार्थ लपवून ठेवणे, हॉलमध्ये येऊ न देणे अशा प्रकारे छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी सदरबझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सध्या कोणासही अटक करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास सुरू आहे.