सातारा : सातारा तालुक्यातील नेले-किडगाव येथे चोरट्यांनी घरातील लोक घरामध्ये झोपले असताना धाडसी चोरी करत सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत,या घटनेने गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेले किडगाव येथे वंदना अशोक बगाडे (वय २१ रा. नेले किडगाव,सातारा) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. बगाडे कुटुंबियांसह घरात झोपले असताना दि.१४ रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा पुढील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. किचन मधील गोदरेजच्या लोखंडी कपाटातील लॉकर कटावणीने उचकटून लॉकरमधील सोन्या चांदीचे १ लाख ४ हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली पेटी दागिन्यांसह चोरून नेले आहेत.
यामध्ये एक सोन्याची चैन,लक्ष्मीहार,सोन्याचे बदाम, सोन्याच्या अंगठ्या,सोन्याची नथ, चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरी केला आहे. या धाडसी चोरीने गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनीदेखील घटना समजतात गावात घटनास्थळी भेट दिली तपासाची चक्रे फिरवली, याचा अधिक तपास पोलीस हवालदार येवले करत आहेत