सातारा : एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीवाय 7472 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी संजय लक्ष्मण गोसावी (वय 54, रा. एमआयडीसी, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 8 ऑगस्ट रोजी घडली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा