सातारा : सध्या दिल्ली येथील, भारत मंडपममध्ये, ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट चालू आहे. या परिषदेसाठी साताऱ्यातील यशोदा कॉलेजच्या कॉम्पूटर विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. सरिता बलशेटवार प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या आहेत.
या जागतिक परिषदेमध्ये सतरा देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सुमारे 35 देशांचे मंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये जगभरातून साधारण पाच हजार प्रतिनिधी सहभाग घेत आहेत. अत्यंत प्रतिषठेच्या अशा या जागतिक महाकुंभात प्रा. डॉ. सौ. सरिता बलशेटवार यांना प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे, त्या विविध चर्चा सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.
या परिषदेत सतरा देशांचे व विविध कंपन्यांचे दालने आहेत. या दालनांमध्ये त्या त्या देशातील कंपन्यांचे एआय संशोधनांचे व वेगवेगळ्या प्रोडक्टसचे प्रदर्शन देखील आहे. हे प्रदर्शन बघण्यासाठी सुमारे पाच ते सात लाख तत्रंज्ञ भेट देतील असा अंदाज आहे.
या ग्लोबल इम्पॅक्ट समिटमध्ये भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, 19 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन करणार आहेत. हि परिषद 20 तारखेपर्यंत चालणार आहे. साताऱ्या जिल्ह्यातून प्रा. डॉ. सौ. सरिता बलशेटवार यांची निवड झाल्यामुळे येथील शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. दिल्ली येथे होणाऱ्या चर्चासत्रांचा लाभ प्रा.डॉ.सौ.सरिता बलशेटवार यांच्या माध्यमातून साताऱ्यातील विद्यार्थांना होणार आहे, अशी खात्री डॉ.अजिंक्य सगरे , डॉ.गणेश सुरवसे, डॉ.पाटील, इ मान्यवरांनी व्यक्त केली आहे.