सातारा : वाहनाच्या व्यवहारातून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उन्मेश शिर्के (रा. पुरंदर, जि.पुणे), रशिद शेख (रा.कन्नड जि.संभाजीनगर) व अनोळखी एकाविरुध्द सुरज सुनील होवाळे (वय २८, रा. हामदाबाज, ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना जुलै २०२४ रोजी घडली आहे. तक्रारदार यांचा लेलंड ट्रक व्यवहाराप्रमाणे नोटरी करुन घेतला. मात्र संशयितांनी एकही फायनान्स कंपनीचा हप्ता न भरता ट्रक नेवून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.