सातारा : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका कार्यक्रमात बूट फेकण्याचा प्रकार झाला या प्रकरणाचा साताऱ्यामध्ये एकमुखी निषेध करण्यात आला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येऊन सोमवारी साताऱ्यात भव्य आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलन प्रक्रियेची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष बापू गायकवाड उपस्थित होते त्यांच्या समवेत अमर गायकवाड तसेच गणेश भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या आंदोलनाला रिपाइं आठवले गटासह कवाडे गट, गवई गट, निकाळजे गट, बुद्धिस्ट महासभा, वंचित बहुजन आघाडी जनता क्रांती दल, दलित महासंघ, ऑल इंडिया मुस्लीम ऑर्गनायझेशनं, छत्रपती मुस्लिम मावळा , लेक लाडकी अभियान तसेच विविध संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे
या आंदोलनाविषयी माहिती देताना अशोक गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेची मांडणी करताना देशातील सर्व नागरिकांना समानतेने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये काही असहिष्णू घटकांमुळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर बूट फेकण्याचे प्रकार होत आहेत हे प्रकार निंदनीय आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या संविधानाचा आदर सर्वांनीच केला पाहिजे .या संविधानातील कोणताही बदल सामान्य जनता ही खपवून घेणार नाही .राज्यातील अल्पसंख्यांकाचे संरक्षण राज्यघटनेचे संरक्षण असहिष्णु प्रवृत्तींचा निषेध याकरिता आम्ही सर्व आंबेडकरवादी संघटना एकत्र आलो आहोत जर आम्ही विभाजित राहू तर आमचे नुकसान आहे सत्ताधीशांच्या माध्यमातून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळणार नाही .अल्पसंख्यांक ठरलेल्या सर्व समाज घटकांचे संविधानासह संरक्षण करणे याचा आवाज आम्ही प्रशासनासमोर उठवणारा असून त्या दृष्टीने येत्या सोमवारी साताऱ्यात मोठे आंदोलन करणारा असल्याचे त्यांनी जाहीर केले संविधान संघर्ष मोर्चा १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता शाहू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे . या मोर्चात सर्व कार्यकर्त्यानी सहभागी होण्याचे आवाहन गणेश भिसे यांनी केले आहे .