08:36pm | Nov 29, 2024 |
सातारा : जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर टाकलेल्या बारिक खडीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उसळत असून, वाहन चालविणे अवघड होत आहे. याबाबत कल्पना देऊनही संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी विसावा नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे जीकिरीचे बनले होते. या रस्त्याची दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. संबंधित ठेकेदाराकडून जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बारिक खडींचा थर टाकण्यात आला. या खडीमुळे धुळीचे प्रचंड लोट उडू लागल्याने याचा वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय डोळ्यात धुळ गेल्याने दोन दिवसांत अनेक अपघातही झाले.
काही सामाजिक कार्यकर्ते तसेच दुकानदार, व्यापार्यांनी याची कल्पना संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाला दिली. मात्र, कोणतीही दखल न घेण्यात आल्याने शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता संतप्त नागरिकांकडून विसावा नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनाची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. रस्त्यावरील खडी उचलली जाईल. धूळ उडू नये यासाठी पाणी मारले जाईल, असे आश्वासन अधिकार्यांनी दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, कामकाजात दिरंगाई करणार्या ठेकेदारांना बिल अदा करु नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता महारुद्र तिकुंडे, रिपाइंचे दादासाहेब ओव्हाळ, तन्मय नवले यांच्यासह व्यापारी, दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |