महाराष्ट्र मंदिर महासंघाचे गुरुवारी साताऱ्यात राज्यस्तरीय अधिवेशन

महासंघाचे जिल्हा संयोजक शिवाजीराव तुपे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 19 March 2025


सातारा : महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 20 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान वेद भवन मंगल कार्यालय कोरेगाव रोड येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे .या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये परंपराचे रक्षण , मंदिर सरकारी मुक्त करणे,मंदिरात वस्त्र संहिता लागू करणे, मंदिर परिसर मद्य व मांस मुक्त करणे इत्यादी विषयांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे तसेच विविध परिसंवाद आणि कार्यक्रम या महाविदेशनात होणार आहेत.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे भक्ती डफळे, तालुका संयोजक अमोल गोसावी, महासंघाचे सदस्य अजित सुपेकर, सातारा जिल्हा हिंदुराष्ट्र संघटक येऊन हेमंत सोनवणे इत्यादी उपस्थित होते. 

तुपे पुढे म्हणाले, "सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक मंदिर प्रतिनिधींना या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले आहे .या अधिवेशनामध्ये मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते अभ्यासक सहभागी होणार आहेत .धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रियांचा अभ्यासक साताऱ्याचे अधिवक्ता जनार्दन करपे, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, कणेरी मठाचे ब्रह्मानंद स्वामी, सनातनचे सदगुरू धारेश्वर महाराज, सदगुरू स्वातीताई खाडे, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट इत्यादी मान्यवरांचा या महा अधिवेशनात सहभाग असणार आहे. या अधिवेशनामध्ये मंदिर सनातन धर्मप्रचाराची केंद्र बनवणे, मंदिराचे पावित्र्य राखणे, मंदिरांना सरकारी प्रक्रियेतून मुक्त करणे, मंदिरांच्या जमिनीवर अतिक्रमणे हटवणे व कायद्याप्रमाणे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यावर प्रतिबंध करणे, मंदिरांच्या जमिनीचे संरक्षण करणे, दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदू जनजागृती समिती पंचपाळे हौद, दुर्गा माता मंदिर ट्रस्ट व महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कविवर्य बा.सी.मर्ढेकरांचा उद्या स्मृतीदिन
पुढील बातमी
औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या