11:06pm | Apr 05, 2023 |
फलटण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठ नेत्या व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उप सभापती निलमताई गोऱ्हे यांनी रामनवमी दिवशी फलटण दौरा केला होता. त्यामध्ये शासकीय विश्रामगृह फलटण येथे त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
यावेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले, शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे आदी पदाधिकारी यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन निलमताई गोऱ्हे यांचे सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत व घोषणांच्या गजरात फलटण नगरीत सहर्ष स्वागत केले.
सर्व शिवसेना पदाधिकारी यांची निलमताई गोऱ्हे यांनी यावेळी विचारपूस केली. पक्ष- संघटना वाढीवर व त्यातील येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा झाली. फलटण तालुक्यातील समस्या व विकासकामे यावर देखील चर्चा करण्यात आली. नुकतीच सुरु झालेली फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडीमधुन एकत्रित लढण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फलटण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात व पक्ष संघटना आणखी मजबूत करावी. फलटण तालुक्यातील वरिष्ठ पातळीवरील समस्या व विकासकामे याबाबत शिवसेना कायम सकारात्मक आहे व सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे निलमताई गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलमताई गोऱ्हे यांच्या या सकारात्मक दौ-यामुळे आम्हा शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी बैठकीनंतर निलमताई गोऱ्हे यांनी श्रीराम नवमीनिमित्त फलटण येथील प्रसिद्ध राममंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे, शहरप्रमुख निखिल पवार, ग्रा.सं. कक्ष जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विकास राऊत, आरोग्य सेनेचे पदाधिकारी शैलेश नलावडे, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, फलटण तालुका महिला आघाडीच्या सुशिला जाधव, झिरपवाडी ग्रामपंचायत सदस्या रेखा गुंजवटे, विभाग प्रमुख तुषार वाडकर, ग्रा.सं.कक्ष उपजिल्हा प्रमुख भारत लोहाना, ग्रा.सं.कक्ष तालुका प्रमुख सुर्यवंशी, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख आदित्य गायकवाड, उपशहर प्रमुख राहुल पवार, शिवसेना शहर संघटीका लता तावरे, शाखाप्रमुख अक्षय तावरे, मंगेश खंदारे, गणेश चोरमले, प्रशांत निंबाळकर, संतोष शिंदे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |