आज दिनांक 17 रोजी सातारा येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सातारा शहराध्यक्ष अजहर मणेर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
याबाबत बोलताना मणेर म्हणाले, महाविकास आघाडी कडून आलेला उमेदवार हा आम्हाला मान्य नसल्यामुळे तसेच तीन पक्ष बदलून आलेल्या उमेदवारावर आमचा विश्वास नसल्यामुळे आम्ही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले, सातारा-जावली विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मागणी केली होती. मात्र, पक्षाने हा विचार न करता शिवसेना उबाठा गटास येथील जागा सोडली. महाविकास आघाडी सातारच्या उमेदवारांबरोबर आम्ही कधीही नव्हतो आणि नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याबाबत आम्हास जिल्हा कार्यकारणीच्या कोणत्याही पदाधिकार्यांनी तसे सांगितले नाही आणि काम केले नाही म्हणून कधी विचारलेही नाही, असेही बोलताना मणेर म्हणाले.
यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला सातारा शहर अध्यक्ष शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेस अजहरभाई मणेर, शिवसेना उपशहरप्रमुख परवेज शेख, आबिद बागवान, इनुस शेख, राहुल माने, अतुल भोसले, पंकज पवार, शारीक बागवान, जुबेर मनेर, सद्दाम मनेर, प्रदीप अडसूळ यांच्यासह मुस्लिम महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.