दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 21 September 2024


सातारा : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोळाचा ओढा ते भू-विकास बँक चौक या रस्त्यावर दुचाकीची (एमएच 11 डीआर 2737) दुभाजकाला धडक बसली. त्यात संजय बबन बाबर (वय 32, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, शाहूपुरी) याचा मृत्यू झाला. ही घटना दि. 6 रोजी घडली. याबाबत पोलीस हवालदार अरुण दुलाजी मोहरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बागवान तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेगवेगळ्या घटनेत दोनजण बेपत्ता
पुढील बातमी
जबरी चोरीप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या