निमा रन 2025 मध्ये धावले 1500 धावपटू; चौथे पर्व साताऱ्यात उत्साहात

by Team Satara Today | published on : 13 October 2025


सातारा : दरवर्षी दिवाळीच्या मुहर्तावर "रन फॉर हेल्थ व रन फॉर ऑल" हे ब्रीदवाक्य घेवून आयोजित होत असलेली निमा रन 2025 चे चौथे पर्व साताऱ्यात पार पडले. यामधे साताऱ्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 1500 धावपटू 10 व 5 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

स्पर्धेला सातारा जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी सातारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राहलदेव खाडे, यशोदा शिक्षण संस्थेचे दशरथ सगरे, साईश डेअरी फार्मच्या दिपाली भागवत, एस जी सी ग्रुपचे विक्रांत कणसे, गौरीशंकर डायग्नोस्टिकचे निलेश बळी हे मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना ट्रॉफी देवून गौरविण्यात ऑले तर खुल्या गटातील विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली.

"निमा" या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे आयोजित होत असलेल्या या स्पर्धेत डॉक्टरांसोबतच बिगर वैद्यकीय स्पर्धक देखील मोठ्या सहभागी होत असतात. लोकांना आरोग्य लाभावे व व्यायामाची सवय लागावी, या हेतूने ही स्पर्धा निमा संघटना आयोजित करीत असते.

यावेळी डॉ. दयानंद घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुनिता चव्हाण यांनी सचिव म्हणून, डॉ शुभांगी गायकवाड यांनी रेस डायरेक्टर म्हणून व डॉ. अभय टोणपे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी निमा रनचे संस्थापक डॉ.  माणिक जाधव व डॉ अनिल शिंगे, निमाचे अध्यक्ष डॉ. संजय नलावडे, निमा उपाध्यक्ष डॉ. सुधाकर लाड व डॉ संजय यादव, निमा सचिव विश्वजित बाबर, निमा रन टीम सदस्य अभिजीत देशपांडे, डॉ. विठ्ठल बर्गे, डॉ. गीता शिंदे, डॉ. किशोर शिंदे व डॉ. अभिराम पेंढारकर यांनी निमा रन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी निमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधाकर बेंद्रे यांच्यासह सर्व निमा पदाधिकारी उपस्थित होते. सर्वाच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -

खुला गट पुरुष - रोहित मिश्रा

खुला गट महिला - साक्षी जड्याल

डॉक्टर्स कॅटेगरी -

18 ते 30 पुरुष डॉ. मृग गायकवाड

31 ते 40 पुरुष - डॉ. सोमनाथ काटकर

31 ते 40 महिला - डॉ.स्नेहल शिवथरे

41 ते 50 पुरुष डॉ.दत्तात्रय तावरे

41 ते 50 महिला - डॉ. वैशाली गायकवाड

51 ते 60 पुरुष डॉ विकास फरांदे

51 ते 60 महिला -डॉ. हर्षला पटवर्धन

61 व त्यापुढे पुरुष डॉ. अरुण देवकाते

61 व त्यापुढे महिला - डॉ. अंजली शिंगे

ओपन कॅटेगरी -

18 ते 30 पुरुष - रोहित मिश्रा

18 ते 30 महिला साक्षी जड्याल

31 ते 40 पुरुष - स्वप्निल कदम

31 ते 40 महिला - दिपाली किर्दत

41 ते 50 पुरुष जयवंत जाधव

41 ते 50 महिला - स्मिता बोरकर

51 ते 60 पुरुष - सुहास आंब्राळे

51 ते 60 महिला - नंदा शिंदे

61 व त्यापुढे पुरुष अजित कंबोज

61 व त्यापुढे महिला - सुजाता पवार.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मांडवे येथील ऊसाच्या शेतामध्ये गांजाची झाडे हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

संबंधित बातम्या