मर्ढे येथे सोमवारी बा.सी.मर्ढेकर जयंती

by Team Satara Today | published on : 29 November 2025


सातारा : युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर यांची जयंती सोमवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ११ मर्ढे या त्यांच्या गावी साजरी करण्यात येणार आहे. ही जयंती मसाप शाहूपुरी शाखेने नूतनीकरण केलेल्या निवासस्थान व स्माराकामध्ये होणार असल्याची माहिती मसाप शाहूपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या जयंतीदिनीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द लेखक, पटकथाकार, कवी निलेश महिगावकर असून अध्यक्षस्थानी रिटकवली येथील प्रसिध्द उद्योजक अरुण मर्ढेकर आहेत. मर्ढे ग्रामपंचायतीचे सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास मर्ढेकप्रेमी, साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सदस्य किशोर बेडकिहाळ, डॉ.उमेश करंबेळकर, वजीर नदाफ, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, सौ.ज्योती कुलकर्णी, सौ. अश्विनी जठार, निमंत्रित सदस्य डॉ.राजेंद्र माने  यानी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोमवार एक डिसेंबरच्या रात्री दहानंतर प्रचारास बंदी; नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी सुट्टी
पुढील बातमी
बाबो...! रॅपिडो चालकाच्या खात्यात सापडले ३३१ कोटी

संबंधित बातम्या