सातारा : मराठी व्यवसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने दि. 20 सप्टेंबर रोजी सातारा येथे भव्य इंजिनिअर डे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र गोवा गुजरात इंदोर येथून व्यवसायिक येणार आहेत याची माहिती संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस व व्यबसाईड सेल प्रमुख गिरीश घुगरे यांनी ही माहिती दिली.
अशोक दुगाडे म्हणाले, सदरचा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल अहिरे, अभियंता राजू जगताप, इंडियन आर्किटेक्ट्स अँड फाउंडर चे नॅशनल प्रेसिडेंट विलास अवचट सर,आणि औद्योगिक कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे .मराठी उद्योजकांच्या विचारांचे आदान प्रदान त्यांनी व्यवसायात केलेली प्रगती तसेच बांधकाम क्षेत्रामध्ये वापरात येत असलेल्या नवनवीन संकल्पना याची सखोल चर्चा या व्यासपीठावर होणार आहे
कर्नाटक महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश येथून बाराशे उद्योजक या प्रदर्शन परिसंवादासाठी येणार आहेत . या कार्यक्रमासाठी क्रेडााई, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, आर्किटेक्चर ग्रुप एम्प्लॉयी इंजिनिअर्स , रोटरी क्लब ,सावली केअर सेंटर इत्यादी सामाजिक संस्था सहभाग घेत आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावाअसे आवाहन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे रीजन हेड सचिन कुंभार यांनी केले आहे.