सातारा : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यामधील सत्ता स्थापन करण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सातारा येथे पत्रकारांना सांगितले.
माझ्या व पाटण मतदारसंघात बाहेरच्या मंत्र्यांनी येऊन घुसखोरी करून मोठमोठ्या घोषणा करून आमच्या मतदारसंघातील वातावरण विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या मतदारसंघातील बहुतांश मतदार आणि आमच्या जागा लोकांनी निवडून दिल्या हीच खऱ्या अर्थाने त्यांना चपराक आहे, असा टोला त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला.
सातारा जिल्हा परिषदेतच्या निवडणुकत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला २२ जागा मिळालेले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये या पक्षाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. एवढे यश मिळाल्याने जल्हिाभरातील अनेक कार्यकर्त्यांनी आज साताऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांनी ना. मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
सातारा हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेले आहे. यावेळची स्थिती थोडी वेगळी होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सैरभैर झाला होता. परंतु भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे असल्याचे कार्यकर्त्यांनी मानले आणि सगळी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाली. त्याचाच हा परिणाम आहे. सातारा जल्ह्यिातील जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसवर वश्विास दाखवल्याबद्दल सातारा जिल्ह्यतील जनतेचे, मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो.
मत्रि पक्षांकडून मतदार संघातील घुसखोरी राजकीय वातावरण वेगळे करण्याच्या प्रयत्नाबद्दल पाटील म्हणाले आमच्या मत्रिपक्षांनी अगोदरच जाहीर केले होते की स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे एकत्रित युती करण्याचा विषय त्यांनीच संपविला होता. त्यामुळे आम्ही आणि शिवसेना शिंदे पक्षाने चर्चा केली होती. त्यामुळे आमच्या पक्षाला २२ आणि शिवसेनेला १५ जागा मिळाल्या. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे यश आम्हाला जल्ह्यिात प्राप्त झाले.
सत्ता स्थापनेबाबत अद्याप कोणाशीही चर्चा झालेली नाही. त्यावेळी वरष्ठिांशी आणि जल्ह्यिातील प्रमुख आणि जेष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करून जल्हिा परिषद आणि पंचायत समत्यिांमधील सत्ता स्थापन करण्याबाबतचा नर्णिय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
मतदारसंघाचा बालेकल्लिा कायम ठेवल्याबद्दल ते म्हणाले, मतदारसंघ माझ्याबरोबर होताच. मात्र जल्ह्यिातील मतदारांनी पक्षाला मोठी साथ दिली. खरे तर मी व माझा मतदारसंघ आणि पाटण विधानसभा मतदारसंघात बाहेरच्या मतदार संघातील मंत्र्यांनी येऊन फार मोठ्या घोषणा आमच्या मतदारसंघात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला मोठमोठ्या गप्पा मारल्या, वातावरण वस्किळीत करण्याचा प्रयत्न केला. सगळं केलं. मात्र आमच्या मतदारसंघातील बहुतांश मतदार आणि आमच्या जागा लोकांनी निवडून दल्यिा. हीच खऱ्या अर्थाने त्यांना चपराक आहे असा टोला त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.