सातारा : सातारा नगरपालिका निवडणूक अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर धडाकेबाज कारवाई करत तब्बल ५१ सराईत गुन्हेगारांना सातारा शहर व तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे. या निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. १ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. संभाव्य गोंधळ, दबाव तंत्रे किंवा बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही मोहीम राबवली.
बी.एन.एस.एस. कलम १६३(२) नुसार जारी आदेशानुसार, हद्दपारीचा कालावधी १ डिसेंबर रोजी ००.०१ ते ३ डिसेंबर रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, लोकशाही हक्क अबाधित ठेवत २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत संबंधितांना मतदानासाठी विशेष सूट देण्यात आली आहे. निवडणूक काळात शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा नगरपालिका निवडणूक २०२५ शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत एकूण ५१ सराईत गुन्हेगारांना सातारा तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे. निवडणूक प्रक्रिया १ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार असून, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या धोक्याचा विचार करून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
बी.एन.एस.एस. कलम १६३(२) अन्वये जारी आदेशानुसार, १ डिसेंबर २०२५ रोजी ००.०१ ते ३ डिसेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत हद्दपारी लागू राहणार असून, २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या ५१ गुन्हेगारांची यादी
जुनैद उर्फ झैद उर्फ जैद अय्याज बागवान रा. शनिवार पेठ, सातारा, सौरभ उर्फ कुक्या कैलास खरात रा. ढोरगल्ली, गुरुवार पेठ सातारा, प्रसाद नितीन साखरे रा. सदरबझार सातारा, रोहित जगन्नाथ नाईक रा. वसंतनगर, खेड सातारा, अबहुरेरा अस्लममिया गोलंदाज रा. केसरकर पेठ सातारा, सुदिप संजय मंगळे रा. कोयना सोसायटी, सदरबझार सातारा, विलास उर्फ यल्ल्या शरणप्पा कुरमणी रा. बॉम्बे रेस्टॉरन्ट सातारा, मयुर शिवाजी नेटके रा. मल्हारपेठ सातारा, आकाश शिवाजी नेटके रा.मल्हारपेठ सातारा, विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे रा. रविवार पेठ सातारा, शुभम शनि कांबळे रा. केसरकर पेठ सातारा, आकाश शनि कांबळे रा. केसरकर पेठ सातारा, गौरव गणेश पाटणकर रा. केसरकर पेठ, आंबेडकर सोसायटी सातारा, बलराम उर्फ करण हणमंत कुहाडे रा. आंबेडकर सोसायटी सातारा, अनिल गुरव मोरे रा. आंबेडकर सोसायटी सातारा, ऋषिकेश रामु विटकर रा. आंबेडकर सोसायटी सातारा रा. गोपाळ गोविंद पाटणकर रा. आंबेडकर सोसायटी सातारा, सचिन शामराव पाटणकर रा. आंबेडकर सोसायटी सातारा, यशवंत उर्फ विशाल दशरथ विटकर रा. आंबेडकर सोसायटी सातारा, अक्षय मधुकर तुपे रा. ११६ रविवार पेठ सातारा, ओंकार कृष्णात देटके रा. गोडोली सातारा, वृषभ राजेंद्र जाधव रा. १६७ रविवार पेठ सातारा, चैतन्य विशाल माने रा. १५०(ब) रविवार पेठ सातारा, सौद अहमद खान रा. जगतापवाडी, शाहूनगर सातारा, अब्दुल इमाम सय्यद रा. गार्डन सिटी अपार्टमेंट, शाहूनगर, साहिल अय्याज इनामदार रा. चारभिती, केसरकर पेठ सातारा, अशरफ अस्लम शेख रा. भिमाबाई आंबेडकर सदरबझार सातारा, प्रतीक तानाजी कांबळे रा. मल्हारपेठ सातारा, अविनाश कुंदन पवार रा. भिमाबाई आंबेडकर नगर, सदरबझार, करण अनिल लादे रा. आंबेडकर नगर, सदरबझार सातारा, यश सुरेश शिंदे रा. रविवार पेठ सातारा, तन्वीर अर्शफ शेख रा .पिरवाडी सातारा, शुभम उर्फ जगीरा सत्यवान कांबळे रा . प्रतापसिंहनगर, खेड सातारा, युवराज रामचंद्र जाधव रा. प्रतापसिंहनगर, खेड सातारा, अमोल उर्फ वज्जाक बबन जाधव रा. शनिवार पेठ सातारा, यश संतोष शिवपालक रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, आतिश आनंदा कांबळे रा. विलासपूर, गोडोली सातारा, अक्षय लालासो पवार रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ, अक्षय संभाजी आढाव रा. क्षेत्रमाहुली सातारा, संतोष अशोक लंकेश्वर रा. प्रतापसिंहनगर सातारा, अर्शद नईम शेख रा. १४६ गुरुवार पेठ सातारा, रसिक अनिल धोत्रे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, विलासपूर, सुजित सुरेश गाडे रा.केसरकर पेठ सातारा, जय यमण्णाप्पा शितमणी रा. भिमाबाई आंबेडकर नगर, सदरबझार, ऋतिक जितेंद्र शिंदे रा. बागडवाडा, गोडोली सातारा, आकाश भगवान कदम रा. खेड सातारा, दत्तात्रय काशिनाथ आसवारे रा. प्रतापसिंहनगर खेड, अंकुश रामा मोरे रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ, दत्तात्रय शिवाजी जाधव रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ, पवन दत्तात्रय जाधव रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ, समाधान दत्तात्रय जाधव रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्या मान्यतेने करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.