सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रल्हाद शिवाजी पवार रा. अजंठा चौक, गोपाळ वस्ती, सातारा हा पिरवाडी परिसरात एका कंपाऊंडच्या आडोशाला संशयितरित्या आपल्या स्वतःचे अस्तित्व, स्वतःचा चेहरा लपवून बसल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस हवालदार त्रिंबके करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत आकाश सुधीर इंगवले राहणार करंजे सातारा हा भूविकास बँक चौकातील खंडू वडापाव दुकानाच्या आडोशास दिनांक 27 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयितरित्या उभा असलेला आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस हवालदार जंगम करीत आहेत.