सातारा : सातारा तालुक्यातील दिव्यनगरी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. ३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी डीवायएसपी राजीव नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या ठिकाणावरून ३ लाख ६७ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला. या छाप्यावेळी परराज्यातील दोन महिला व एक महाराष्ट्रातील महिला अशा तीन महिला वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. त्याप्रकरणी शुभम विलास कल्याणकर वय २३ रा. स्वप्नशिल्प हौसिंग होसायटी मांजरी ता. हवेली पुणे, आदित्य संजय मोहिते वय २४ रा. आंबेदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या ठिकाणाहून १५00 रुपये रोख रक्कम व १५ हजार रुपये रोख रक्कम व १५ हजार रुपयांचा मोबाईल, ३ लाख रुपयांच स्वीप्ट कार, ५0 हजार रुपयांचा आयफोन, १ हजार रुपयांचा साधा फोन असा एकूण ३ लाख ६७ हजार ५२0 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे करत आहेत.