सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून अल्पवयीन महाविद्यालयीन युवकाला 13 जणांच्या जमावाने फायटर आणि लोखंडी पाईप ने बेदम मारहाण केली. या मारहाणीत हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार बाळकृष्ण लवंगारे वय 17, रा. पसरणी, ता. वाई असे जखमी युवकाचे नाव आहे. यश चव्हाण रा. व्याजवाडी, ता. वाई, ओंकार पिसाळ राहणार बावधन तालुका वाई, विवेक गाढवे, सार्थक भोसले, गणेश गोळे, वेदांत पिसाळ, ओंकार भोसले, करण ठोंबरे, आकाश भोसले, अथर्व गुरव, भूषण पिसाळ सर्वजण राहणार बावधन, गणेश चव्हाण, योगेश पूर्ण नाव माहित नाही राहणार व्याजवाडी या 13 जणांनी लवंगारे याला बेदम मारहाण केली.
हा प्रकार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता वाई-पाचवड रस्त्यावरील हॉटेल जिव्हाळा परिसरात घडला. प्राप्त माहितीनुसार ओंकार लवंगारे घरी जात असताना जुन्या भांडणाच्या कारणातून यश चव्हाण यांनी त्याच्या हातातील फायटरने ओंकारवर हल्ला केला. ओंकार भोसले याने हातातील लोखंडी पाईप डोक्यात मारल्यामुळे फिर्यादी जखमी झाला व इतर दहा जणांनी ओंकारला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस हवालदार गहिन एस के तपास करत आहेत.
जुन्या भांडणाच्या रागातून युवकाला मारहाण
by Team Satara Today | published on : 30 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा