लिंब येथे सुनेला आणण्यासाठी गेलेल्या सासऱ्यावर जीवघेणा हल्ला; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 04 March 2026


सातारा : तालुक्यातील लिंब येथे सुनेला आणण्यासाठी गेलेल्या सासरा, पती, सासू,दीर यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना दि १ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सासरे विनोद खटपट्या भोसले (वय ५० रा.  बनवडी, ता. कोरेगाव) हे सून वैधवी रोहित भोसले हिला आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंकिता,मुलगा रोहित,पुतण्या अभिषेक भोसले होते. यावेळी खुदमाशा दादया भोसले, पितांबऱ्या चिलबिल्या शिंदे, चिक्या हमसफर भोसले (सर्व रा. लिंब ता. सातारा) यांनी कोणतेही बाजू ऐकून न घेता मारहाण केली. यावेळी भीतीने पळून जात असताना दाद्या भोसले याने कोरडीचे लाकडी दांडके फेकून मारल्याने सासरे विनोद भोसले यांच्या डाव्या डोळ्याला मार लागला आहे. तसेच सर्वांनी सून वैधवी हिला पाठविणार नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली आहे. याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात सासरे विनोद खटपट्या भोसले यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इंस्टाग्रामवरून अल्पवयीन युवतीला शरीर सुखाची मागणी; युवकावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल.
पुढील बातमी
एसटीमधून साडेचार लाखांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली; कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

संबंधित बातम्या