सातारा : शहरात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार नाका, राधिका चौक आणि जुना मोटार स्टँड परिसरातील दुकानांमध्ये चोरी करण्यात आली आहे.मकरसंक्रांतीच्या दिवशी रात्री १० नंतर ही घटना घडली आहे.
याप्रकरणी साजिद शाफिक शेख (वय ३६, रा. बुधवार नाका, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवार नाका येथील जस्ट क्लिक दुकानातून ३७ हजार रुपयांची रोकड, सायली किराणा जनरल स्टोअरमधून २ हजार रुपये तसेच विशाल अर्जुन चव्हाण यांच्या अरुण हब आईस्क्रीम पार्लर व डेअरीमधून २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. एकूण ७४ हजार ५०० रुपयांची चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.