डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला देणार हे घातक क्षेपणास्त्र

by Team Satara Today | published on : 13 October 2025


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास-इस्त्रायल यांच्या युद्धबंदीनंतर थेट रशिया-युक्रेन युद्धात उडी घेतली. हमास इस्त्रायलमधील युद्धाच्या अगोदर त्यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अजिबातच यश मिळाले नाही मग काय त्यांनी आपला मोर्चा थेट गाझा पट्टीकडे वळवला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून हमास इस्त्रायल युद्धाबाबत मोठा करार देखील झाला. या युद्धाच्या पहिल्या करारावर सह्या झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा हा थेट युक्रेन रशियाच्या युद्धाकडे वळवला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा इशारा हा रशियाला दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया धमकी देत स्पष्ट शब्दात सांगितले की, जर रशियाने युद्ध लवकर संपवले नाही तर युक्रेनला घातल क्षेपणास्त्र आम्ही देऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, स्पष्ट सांगतो की, जर हे युद्ध थांबले नाही तर मी युक्रेनला लांब पल्ल्यााचे टॉमहॉक हे घातक क्षेपणास्त्र पाठवणार आहे.

जर खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला हे क्षेपणास्त्र दिले तर रशियाचे मोठे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. टॉमहॉक हे एक अविश्वसनीय शस्त्र आहे, ते खूपच आक्रमक आहे. रशियाने यापूर्वीच स्पष्ट सांगितले की, जर अमेरिकेने युक्रेनला टॉमहॉक हे क्षेपणास्त्र दिले तर रशियाचे मोठे नुकसान होईल, पण आम्ही त्या संकटाचा देखील चांगल्या प्रकारे सामना करून आणि आम्ही आमच्या सुरक्षेसाठी तत्पर नक्कीच आहोत.

जर अमेरिकेने युक्रेनला हे क्षेपणास्त्र दिले तर याची मोठी किंमत अमेरिकेलाही भोगावी लागेल. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठे नुकसान होत आहे. युक्रेननो रशियाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेकडे  टॉमहॉक क्षेपणास्त्राची मागणी केली. अनेक युक्रेनियन पॉवर ग्रिड नष्ट झाले आहेत, ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. या आक्रमकतेनंतर ट्रम्प संतापले आहेत. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी जिंकला फिल्मफेअर पुरस्कार
पुढील बातमी
‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ला (पीएमआयएस) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने सरकार चिंतेत

संबंधित बातम्या