सातारा शहरातील गणेश मंडळांची बैठक

by Team Satara Today | published on : 13 July 2025


सातारा : ऑगस्ट महिन्यात येणार्‍या गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक सोमवार, दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर येथे होणार आहे. या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार आहेत,. याबाबत सर्वांची उत्सुकता लागून राहीली आहे.गणेशोत्सव आता काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे सातारा शहरातील सर्व गणेश मंडळाची गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकजूट झाली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याला लागणार्‍या परवानगीसाठी एक खिडकी योजना असावी, यासह इतर अनपेक्षीत येणार्‍या प्रश्नांवर कशाप्रकारे मात करुन ते सोडवली जातील, याबाबत उहापोह करण्यात येणार आहे.गतवर्षी गणेश मंडळांना परवानग्यासह इतर बाबीसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. ते विचारात घेता यावर्षी गणेशोत्सवापूर्वी त्याच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना तसेच लाईटच्या संदर्भात असलेल्या अडचणी यायाबबत प्राथमिक चर्चाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळांच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याचे नामकरण राजधानी सातारा करण्याची शिवसेनेची मागणी
पुढील बातमी
झेडपीचा प्रारुप आराखडा उद्या होणार प्रसिध्द

संबंधित बातम्या