सातारा : तालीम संघ परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील तालीम मैदान संघासमोर असलेल्या समाज मंदिराजवळील रस्त्यालगत लावलेली दुचाकी (एमएच 50 बी 3625) दि. 16 रोजी अज्ञाताने चोरुन नेली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात रशीद मोहीद्दिन शेख (वय 67, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.