मुंबई : भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणावाचे पडसाद देशांतर्गत शेअर बाजारात उमटल्याचे दिसून आले. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर बाजारात उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांकात मोठी पडझड झाली.
सेन्सेक्स ५०० अंक घसरून खुला झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २० हजार अंकांच्या खाली आला. लक्षात घ्या की अनेक कॅनेडियन पेन्शन फंडांनी भारतीय कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली असून यामध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB), क्यूबेक वर्कर्स आणि ओंटारियो स्कूल टीचर्स पेन्शन फंड यांचा समावेश आहे ज्यांनी अलीकडे भारतात त्यांची कार्यालये उघडली आहेत.
कोणते शेअर्स घसरले?
सकाळच्या सत्रात HDFC बँक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआयशिवाय नेस्ले इंडिया, आयटीसी, टीसीएस, एनटीपीसी आणि टाटा मोटर्स शेअर्स लाल रंगात रंगलेले दिसून आले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी रोखे उत्पन्न १६ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले, ज्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरले. HDFC बँकेच्या स्टॉकमध्ये सर्वाधिक घसरण झाली तर रिलायन्सचे शेअर्सही सुमारे दोन टक्क्यांनी खाली आली आहेत. CPPIB ने भारतातील ७० सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून कोटक महिंद्रा बँकेत त्यांचा २.७% हिस्सा आहे. अशा स्थितीत राजकीय तणावाचे परिणाम कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सवरही दिसून आले जे ०.६०% घसरणीसह १७८६.७० रुपयांवर व्यवहार करत आहेत.
त्याचप्रमाणे, क्यूबेकच्या पेन्शन फंडाने गेल्या वर्षाच्या अखेरीस वजनात आठ अब्ज कॅनेडियन डॉलर्सची गुंतवणूक केली असून ओंटारियो शिक्षकांच्या पेन्शन योजनेने भारतात तीन अब्ज कॅनेडियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अशाप्रकारे ऑगस्टअखेर भारतीय बाजारात कॅनडाची गुंतवणूक १.७७ लाख कोटी रुपये असून यातील १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |