सातारा : सातारा बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साधना बाळकृष्ण चव्हाण रा. नेर, ता. खटाव जि. सातारा या सातारा बस स्थानकात बस मधून खाली उतरत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सपकाळ करीत आहेत.
सातारा बस स्थानकातून मंगळसूत्राची चोरी
by Team Satara Today | published on : 13 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा