प्रशासकीय इमारत परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 06 April 2025


सातारा : प्रशासकीय इमारत परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान प्रशासकीय इमारत सातारा येथील पार्किंग मध्ये पार्क केलेली श्रीकांत यशवंत लोंढे रा. मंगळवार पेठ, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 एक्यू 645 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहरे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता
पुढील बातमी
"भारतरत्न" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन

संबंधित बातम्या